पुणे : गेले महिनाभर पुणे शहरात दररोज सरासरी १५० ते २५० नव्या कोरोना बाधितांची संख्या नोंदवण्यात येत होती. तर, कोरोना मुक्तांचा आकडा देखील नव्या बाधितांपेक्षा अधिक होता. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुणे शहरात निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. तरीदेखील कोरोना चाचण्यांचे प्रमाण हे अधिक राहावे यासाठी प्रशासन काम करत आहे. दरम्यान, सण, उत्सवांचा काळ हा सुरु होत असतानाच आता पुणेकरांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
कारण आज पुणे शहरात नव्या बाधितांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. पुणे शहरात आज नव्याने तब्बल ३९९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९४ हजार १८५ इतकी झाली आहे. तर शहरातील २१६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८३ हजार २२१ झाली आहे.
दरम्यान, आज एकाच दिवसात ८ हजार ९६१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३० लाख ८२ हजार ७९३ इतकी झाली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या २ हजार ०६६ रुग्णांपैकी २०८ रुग्ण गंभीर तर २५७ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर, नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८९८ इतकी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बँक कर्मचाऱ्यांना अर्थमंत्री सीतारामन यांचं मोठं गिफ्ट; कुटुंब निवृत्तीवेतनात तब्बल ‘इतकी’ वाढ
- कोरोना काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’-यशोमती ठाकूर
- भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांमध्ये गुंडाळला; ९ खेळाडू दोन आकडी संख्या न गाठताच माघारी
- कोरोना काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’-यशोमती ठाकूर
- शेतकऱ्यांच्या आर्थिक समृध्दीसाठी मत्स्यशेती वरदान ठरेल – राज्यमंत्री भरणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

