पुणे : पुण्यात कोरोनाचा काल पहिला बळी गेला आहे. कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी नाकाबंदी कडक केली आहे. विशेष म्हणजे मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक करणार्यांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना अनेकांना पोलिसांनी वारंवार विनंती आणि आवाहन केलं आहे.
दरम्यान, तरीही अनेक जण ऐकत नसल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.तसेच पुणे शहरात आतापर्यंत 200 हून अधिक वाहनंही जप्त केली आहेत.
पुण्यात पहिला बळी गेल्याने पुणेकरांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
