Share

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई; नक्सलवादी कनेक्शन प्रकरणी चौघांना अटक

Published On: 

पुणे: १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये ३१ डिसेंबरला शनिवार वाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेचे आयोजक आणि विद्रोही कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

सुधीर ढवळे यांच्यासह वकील सुरेंद्र गडलिंग,माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना नागपूर आणि दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. तर मुळचे गडचिरोलीचे असणारे महेश राऊत यांना देखील नागपूरमधून अटक करण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, दंगलप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले संभाजी भिडे यांना अटक न करता एल्गार परिषदेच्या आयोजकांना अटक करण्यात आल्याने त्यांचा समर्थकांनी देवनार पोलीस ठाण्याबाहेर जमायला सुरुवात झाली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!