Share

पुणेकरांची ‘आधार’साठी वणवण

Published On: 

पुणे: बँक खाते असो कि मोबाईल क्रमांक ते थेट सरकारी योजनांचा लाभ, प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड जोडणी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र सध्या पुणे शहरात अपुऱ्या आधार केंद्रांमुळे नागरिकांना काम धंदा सोडून फिरण्याची वेळ आल्याच पहायला मिळत आहे. उपनगरांमध्ये तर नागरिकांना पहाटेपासून रांगा लावून बसाव लागत आहे. पुणे शहरात मध्यवस्तीत असणाऱ्या केंद्रांवर एक एक आठवडा आधी टोकन घेतले तरीही नंबर येत नाही. त्यातच आता बँक खाते व मोबाइल क्रमांक आधार कार्डाशी जोडण्याची अंतिम मुदतही जवळ आल्याने आधार कार्ड काढण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

दरम्यान ज्यांनी आधी अधारकार्ड काढले आहे त्यांचे फॉर्म भरताना देखील मोठ्या प्रमाणात चुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे असे आधार कार्ड बँक खात्याशी अथवा  पॅनकार्डशी लिंक करताना अडचणी येत आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या बाजीराव रोडवर वर्धमान हाईट्स येथे एक आधार केंद्र आहे. येथील नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.गेल्या तीन दिवसांपासून या केंद्रावर येत आहे. मात्र टोकन मिळत नाही त्यामुळे नौकरीला देखील जाता येत नसल्याचं गिरीश आंधळे यांनी महाराष्ट्र देशाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, तर आधी दोन वेळेस आधार कार्ड काढले आहे. मात्र दरवेळी काहीतरी चूक केली जाते त्यामुळे आधार कार्ड बँक खाते तसेच पॅनकार्डशी लिंक होत नसल्याने पुन्हा त्यात दुरुस्ती करण्यासाठी फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार अनेकांनी केल्या आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!