पुणे : राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीसाठी 5 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख 17 नोव्हेंबर आहे.
भाजपने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील पक्ष पदवीधर व शिक्षक मतदार संघातील उमेदवार निवडीचा पेच कसा सोडवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे पदवीधर मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडेच जाणार असा तर्क लावण्यात आला होता. अखेर उमेदवार कोण याची उत्सुकता समाप्त झाली आहे.
पुणे विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते अरुण अण्णा लाड यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. अरुण अण्णा लाड हे क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. तसेच स्वातंत्र्य सैनिक – क्रांतीअग्रनी स्वर्गीय जी. डी. बापू लाड यांचे पुत्र आहेत. तर पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी झाल्या कोरोनामुक्त
- सत्तेसाठी भाजपने नाही तर शिवसेनेनेच विश्वासघात केला – फडणवीस
- ‘मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांना लादणं हा लोकमताचा अवमान’
- WHO : जागतिक स्तरावरील आणि सार्वभौमिक आरोग्य व्याप्तीमध्ये भारताच्या नेतृत्वाचे स्वागत!
- सर्वोच्च न्यायालयाच्या या तातडीच्या सुनावणीबाबत आश्चर्य : ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

