मुंबई : भाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. यावेळी महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्षनेत्याच्या जबादारी सोबतच बिहारमधील प्रचाराची जबाबदारी देखील पार पडली होती. यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सद्या त्यांनी कोरोनावर मात केली आहे.
बिहारमध्ये भाजपने जेडीयूसोबत निवडणूक लढवली आणि बहुमताचा आकडा गाठला. तेजस्वी यादव यांनी कडवी टक्कर दिली असली तरी भाजपला आपल्या जागा वाढवण्यात यश आल्यानंतर अनेक नेत्यांनी याचं श्रेय बिहार निवडणुकीची जबाबदारी सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांना दिलं आहे.
यानंतर, विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार निकालांच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ झाला आहे. त्यामुळे जास्त जागा मिळाल्यातरी मुख्यमंत्री हे नितीशकुमारचअसतील असतील असं भाजपने जाहीर केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिला होता आणि आम्ही तो पाळणार आहोत” असं देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केलं. तर, “महाराष्ट्रात असा कुठलाही शब्द आम्ही दिला नव्हता. सत्तेसाठी भाजपने नाही तर शिवसेनेने विश्वासघात केल्याचा” आरोपही फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पदवीधर निवडणूक : पंकजा मुंडे समर्थकांची डबल बंडखोरी
- बिहारच्या विजयात माझा खारीचा वाटा!, कौतुकानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
- टेलिकॉमनंतर मुकेश अंबानी करणार रिटेल क्षेत्रात प्रवेश ! अॅमेझॉन, वॉलमार्टला देणार टक्कर
- काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी मोठा ओघ; अनेक नेते संपर्कात – बाळासाहेब थोरात
- ठाकरे सरकार चार वर्षे चालणार नाही, पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजपचं विजयी होणार : पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
