Share

सर्वोच्च न्यायालयाच्या या तातडीच्या सुनावणीबाबत आश्चर्य : ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण 

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णव गोस्वामींसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, अर्णवच्या सुटकेवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या तातडीच्या सुनावणीबाबत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण  यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कित्येक वर्षे कोठडीत न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या कैद्यांच्या बाबतीत अशी तत्परता का दाखवली जात नाही, असा सवाल भूषण यांनी विचारला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

आत्महत्येस प्रवृत्त करणं व इतर दोन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अर्णब यांना अंतरिम जामीन देण्यास नकार देऊन त्यांना स्थानिक न्यायालयात दाद मागण्यास सांगितलं होतं. गोस्वामी यांना तळोजा येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टातील अपील याचिकेत केंद्र सरकार, अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग व अक्षता अन्वय नाईक यांना प्रतिवादी केलं होतं. राज्य सरकारच्या वतीने वकील सचिन पाटील यांनी सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट दाखल केले असून गोस्वामी यांच्या याचिकेवर राज्य सरकारचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठलाही आदेश पारित करू नये अशी विनंती केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!