Share

पुणे कोरोना अपडेट: केंद्रातर्फे १०० व्हेंटिलेटर्स! केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर घालणार विशेष लक्ष

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोरोनाने मुंबई पाठोपाठ पुण्यातही कहर घातला असून परिस्थिती अजूनही आटोक्यात नसल्याचे वाढत्या रुग्णसंख्येवरून समजत आहे. तर आता केंद्राचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे स्वतः लक्ष घालून येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लक्ष घालणार आहेत.

तर, पंतप्रधान कार्यालयास विनंती केल्यानंतर पुण्यासाठी १०० व्हेंटिलेटर पाठविले जातील. तर, आजपासूनच याची सुरुवात होणार आहे. प्रकाश जावडेकर हे पालकमंत्री व अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतील. पुण्यातील रुग्णसंख्या ५० हजारांपर्यंत पोहोचली असून कोरोना बाधितांसाठी सर्वोत्तम आरोग्य यंत्रणा उभारण्याची गरज आहे. तर, व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

अरे देवा…. नागपूरकरांवर लटकतेय ‘इतक्या’ दिवसांच्या लॉकडाऊनची टांगती तलवार ?

त्यामुळे, व्हेंटिलेटर पुरविण्याची केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी चर्चा केली असून पंतप्रधान कार्यालयाने देखील पीएम केअर्सकडे पुण्याला व्हेंटिलेटर्स देण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यामुळे आता टप्प्या-टप्प्याने १०० व्हेंटिलेटर्स दिले जाणार असून लगेचच पुरवत सुरु करण्यात आला आहे.

राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही, नितेश राणेंचा घणाघात

तसेच, देशात अनेक यशस्वी प्रयोग झाले असून पुण्यातही व्हावेत यासाठी जावडेकर हे आज पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारें आढावा घेण्याची माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.

महाराष्ट्राला मिळाले हक्काचे पैसे; केंद्र सरकारकडून मिळाले तब्बल १९ हजार २३३ कोटीचा जीएसटी परतावा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!