🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारकडून केंद्राकडे जीएसटी परतावा देण्याची मागणी होत होती, अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत केंद्र सरकारला पत्रही लिहिलं होतं, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. आता याला यश मिळाल्याचे आहे. केंद्र सरकारने मार्च २०२० साठी राज्यांचा जीएसटी परतावा दिला आहे. त्यात सर्वाधित जीएसटी परतावा रक्कम महाराष्ट्राला मिळाली आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या २०१९-२० जीएसटी परताव्याची एकूण रक्कम १ लाख ६५ हजार ३०२ कोटी इतकी आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला १९ हजार २३३ कोटी सर्वाधिक रक्कम दिली आहे. त्यानंतर कर्नाटक राज्याचा नंबर लागतो, कर्नाटकला १८ हजार ६२८ कोटी रुपये जीएसटी परतावा म्हणून मिळाले आहेत.
त्यानंतर आंध्र प्रदेश – ३ हजार २८ कोटी, आसाम – १ हजार २८४ कोटी, बिहार – ५ हजार ४६४ कोटी, छत्तीसगड – ४ हजार ५२१ कोटी, दिल्ली- ८ हजार ४२४ कोटी,गोवा – १ हजार ९३ कोटी, गुजरात – १४ हजार ८०१ कोटी, हरयाणा – ६ हजार ६१७ कोटी, हिमाचल प्रदेश – २ हजार ४७७ कोटी, जम्मू काश्मीर – ३ हजार २८१ कोटी, झारखंड – २ हजार २१९ कोटी, केरळ – ८ हजार १११ कोटी, मध्य प्रदेश – ६ हजार ५३८ कोटी, महाराष्ट्र – १९ हजार २३३ कोटी, मेघालय – १५७ कोटी, ओडिशा – ५ हजार १२२ कोटी, पौंडेचेरी – १ हजार ५७ कोटी, पंजाब – १२ हजार १८७ कोटी, राजस्थान – ६ हजार ७१० कोटी, तामिळनाडू – १२ हजार ३०५ कोटी, तेलंगणा – ३ हजार ५४ कोटी, त्रिपूरा – २९३ कोटी, उत्तर प्रदेश – ९ हजार १२३ कोटी, उत्तराखंड – ३ हजार ३७५ कोटी, पश्चिम बंगाल – ६ हजार २०० कोटी. या सर्व राज्यांना देखील केंद्राकडून जीएसटी परतावा मिळाला आहे.
बकरी ईद बाबत मंत्री नवाब मलिक यांचा खुलासा
खरीप हंगामासाठी राज्य शासनाने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
