Share

राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही, नितेश राणेंचा घणाघात

Published On: 

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राजकारणात आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झाले आहेत. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवले आहे. त्यामुळे टीका करताना विचार करा, पायदळी यायला वेळ लागणार नाही, अशी टीका माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. यावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

राजेश क्षीरसागर यांच्या या टीकेला भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘राजेश क्षीरसागर सारख्या भुंकणाऱ्यांना माहित आहे. राणेंवर बोलल्याशिवाय मातोश्री बिस्कीट टाकत नाही. राज्यपाल नियुक्त आमदारकीचे बिस्कीट आमच नाव घेतले कि मिळेल असा गैरसमज झाला असेल. पण रामदास कदम सारख्यांचे भुंकून किती दात उरले आणि काय अवस्था मातोश्रीने केली हे ही लक्षात ठेवावे’! अस ट्विट करत नितेश राणे यांनी राजेश क्षीरसागर यांना जोरदार टोला लगावला आहे.

…तर शिवसेनेसोबत येण्यास भाजपा तयार: चंद्रकांत पाटील

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील सीपीआरमध्ये बेड्स आणि कपाटांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या टीकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे हे संयमी नेतृत्व आहे. राज्यभर उगाच दिंडोरा पिटवून राज्यकारभार होत नाही. चंद्रकांत पाटलांना युतीचा इतिहास माहीत नसेल. गेल्या तीस वर्षांपासून भाजप आणि शिवसेना यांची युती होती. या कालावधीत ‘मातोश्री’वरील नेत्यांनी कधीही माध्यमातून प्रतिक्रिया न देता केवळ आपल्या मुखपत्रातून मत व्यक्त केले. ‘मातोश्री’वर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो हे नारायण राणे यांनी अनुभवलं आहे. त्यामुळे टीका करताना विचार करून करावी, असा सल्लाही राजेश क्षीरसागर यांनी दिला.

प्रभू राम पवारांना ‘सम’बुद्धी देवो, भाजपचा जोरदार टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!