Share

पुण्यात कोरोनाचे थैमान, एकाच दिवशी तब्बल एवढे कोरोना रूग्ण !

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या ३८७० नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १५९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६५ हजार ७४४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत. उर्वरित १०१ मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-७० (मुंबई ४१, ठाणे मनपा २९), नाशिक-८ (नाशिक ७, अहमदनगर १), पुणे-१४ (पुणे १४), औरंगाबाद-१ (औरंगाबाद १), लातूर-१ (लातूर १), अकोला-७ (अकोला ४, अणरावती १, बुलढाणा १, वाशिम १). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६१७० झाली आहे.

दिलासादायक : राज्यात ६५ हजार ७४४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले घरी

दरम्यान, पुण्यामध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे आज पुण्यात तब्बल ६२० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंत एका दिवसात वाढलेली रेकोर्डब्रेक रुग्ण संख्या आहे यात नायडू-महापालिका रुग्णालये ४४१, खासगी १५८ आणि ससूनमधील २१ रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संख्या १२ हजार ४७४ इतकी झाली आहे.

अरक्षणासाठीचा लढा उभारणं का गरजेचं होतं, हे कालच्या निकालाने सिद्ध झालं – संभाजीराजे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!