Share

अरक्षणासाठीचा लढा उभारणं का गरजेचं होतं, हे कालच्या निकालाने सिद्ध झालं – संभाजीराजे

Published On: 

पुणे : गुणवत्ता आहे परंतु आरक्षण नाही. आरक्षण नसल्याने शिक्षणात आणि नोकरीत संधी नाही. गुणवत्ता असूनही फक्त आरक्षणा अभावी शिक्षणात आणि नोकरीत संधी नसल्याने राज्यातील मराठा समाज विवंचनेत अडकला होता. राज्यातील मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा, लाख मराठा’ची हाक देऊन मूक मोर्चाला सुरुवात केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत मराठा समाजाने तब्बल 128 जण आरक्षणाचा लाभ घेऊन अधिकारी झाले आहेत. क मराठा, लाख मराठा’ हाक ठरली भारी, समाजातील 128 जण झाले अधिकारी असेच सुखद चित्र आज राज्यभर दिसत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यासाठी धाडसी पाऊल उचलले. त्यांच्या सरकारने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास या प्रवर्गात नोकरीसाठी 12 टक्के व शिक्षणासाठी 13 टक्के आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पहिलीच जाहिरात 2019 मध्ये आली होती. जाहिरातीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. आरक्षणाचा लाभ घेऊन मराठा समाजातील विद्यार्थी/विद्यार्थिनी अधिकारी झाल्याची पहिलीच घटना शुक्रवारी घडल्याने आरक्षणासाठी केलेल्या संघर्षाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.

दरम्यान मराठा समाजातील युवकांच्या या उत्तुंग यशाबद्दल खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या भावना व्यक्त करत मराठा आरक्षणाची काय गरज होती हे अधोरेखीत केलं आहे. एमपीएससी परीक्षेतुन निवड झालेल्या सर्व भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन. मराठा समाजातील मुलांची संख्या बघून समाधान वाटलं. अरक्षणासाठीचा लढा उभारणं का गरजेचं होतं, हे कालच्या निकालाने सिद्ध झालं. माझे सर्व समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांना आवाहन आहे, की येणाऱ्या काळात महाराष्ट्रापुढे अभूतपूर्व आव्हाने उभे राहतील, त्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देण्याकरिता प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही स्वतः सिद्ध व्हाल, आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षात सर्वोच्च योगदान द्याल ही अपेक्षा. आशा भावना संभाजी राजे यांनी व्यक्त केल्या आहेत.

एक मराठा, लाख मराठा ; आरक्षणातून तब्बल १२८ जण झाले अधिकारी

आरक्षणाचा लाभ घेऊन असे झाले अधिकारी

उपजिल्हाधिकारी : 13, पोलिस उपअधिक्षक : 11, राज्य कर सहाय्यक आयुक्त : 3, उपमुख्य कार्यकारी अधिकारी : 6, अर्थ विभाग सहाय्यक संचालक : 2, औद्यगिक उपसंचालक : 2, तहसीलदार : 22, उपशिक्षणाधिकारी : 12, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी : 1, सेक्शन ऑफिसर : 6, सहाय्यक गटविकास अधिकारी : 2, भूमिअभिलेख उपअधीक्षक : 3, राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक : 2, औद्योगिक अधिकारी : 9, सहाय्यक प्रकल्प संचालक : 1, नायब तहसीलदार : 33, एकूण : 128

मटका व्यवसायात वडिलांनी जिव गमवला, मुलागा जिद्दीने लढून नायब तहसीलदार बनला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!