मुंबई : कोरोनाच्या ३८७० नवीन रुग्णांचे निदान आज झाले असून सध्या राज्यात ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात आज १५९१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६५ हजार ७४४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
जिगरबाज कृषिमंत्री : शेतकरी बनून जेव्हा स्वत: कृषिमंत्री दुकानात जातात…
राज्यात १७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे वर नमूद केल्याप्रमाणे मागील कालावधीतील आहेत. उर्वरित १०१ मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-७० (मुंबई ४१, ठाणे मनपा २९), नाशिक-८ (नाशिक ७, अहमदनगर १), पुणे-१४ (पुणे १४), औरंगाबाद-१ (औरंगाबाद १), लातूर-१ (लातूर १), अकोला-७ (अकोला ४, अणरावती १, बुलढाणा १, वाशिम १). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६१७० झाली आहे.
अरक्षणासाठीचा लढा उभारणं का गरजेचं होतं, हे कालच्या निकालाने सिद्ध झालं – संभाजीराजे


