टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षांतर करत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता निवडणुक अवघ्या काही दिवसांवर आली आहे तरीही पक्षांतर सुरूच आहे. मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचाराले आले असताना पुणे शहरातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पुणे शहरातील शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या दोन मतदारसंघातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना मोठा धक्का बसला आहे. भाजप प्रवेश करण्यापूर्वी हे कार्यकर्ते कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची माहिती आहे.
ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामध्ये माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड यांचे सुपूत्र आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, लहु बालवडकर, समाधान शिंदे, तुकाराम जाधव, सुरेश कांबळे, कमलेश चासकर, अभय सावंत व दुर्योधन भापकर यांचा समावेश आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप पुणे शहरात अधिकच मजबूत झाली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर अनेक नेत्यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली आहे. त्यात राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील चित्र वाघ, अब्दुल सत्तार मधुकर जाधव यांच्यासह अनेक आघाडींच्या नेत्यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182524315465474048?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182515391798505472?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182515021114249217?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

