🕒 1 min read
पुणे : “निरोप घेतो देवा आज्ञा असावी, काही चुकले माकले असेल तर क्षमा द्यावी” , अशीच भावना आज प्रत्येक गणेशभक्तांच्याच्या मनी असेल. यंदा या कोरोना रोगाच्या सावटामुळे विघ्नहर्त्याचे आगमन अत्यंत साधेपणाने झाले. ना भव्य मंडप, ना देखावे, ना मिरवणुक, ना ढोल-ताशांचा गजर अशा साधेपणाने बाप्पा विराजमान झाले होते.
आज, अनंत चतुर्दशी! बाप्पाला निरोप देण्याचा दिवस बघता बघता उभा ठाकला आणि गेले ५ महिने कोरोनाच्या कहराच्या दहशती खाली जात असताना गणेशोत्सवाच्या काळात मात्र काहीसं वातावरण बदलून गेलं होत. संस्कृतीचा वारसा लाभलेल्या पुण्यासह राज्यभरात भव्य-दिव्य मिरावणुकींनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो, ती भव्यता जरी यंदा नसली तरी भक्तिभावात मात्र कोणतीही कमी नाही.
#अनंत_चतुर्दशी : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन कधी? घ्या जाणून
परंपरेनुसार महापौरांनी आरती केल्यानंतर मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन करण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह आमदार मुक्ता टिळक देखील यावेळी उपस्थित होत्या. मानाचा पहिला व पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे विसर्जन सकाळी ११:३० वाजता, मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीच १२:३० ला, मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं १२.४५ ला, मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं १.१५ ला आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचं दुपारी १:३० वाजता विसर्जन करण्यात आलं. तर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन परंपरेनुसार भंडारा उधळून दुपारी २.४५ ला कृत्रिम हौदात करण्यात आलं.
इम्तियाज जलीलांची मंदिर प्रवेशावरून अखेर माघार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

