पुणे : निरोप घेतो देवा आज्ञा असावी, काही चुकले माकले असेल तर क्षमा द्यावी” , अशीच भावना आज प्रत्येक गणेशभक्तांच्याच्या मनी असेल. यंदा या कोरोना रोगाच्या सावटामुळे विघ्नहर्त्याचे आगमन अत्यंत साधेपणाने झाले. ना भव्य मंडप, ना देखावे, ना मिरवणुक, ना ढोल-ताशांचा गजर अशा साधेपणाने बाप्पा विराजमान झाले होते.
आज, अनंत चतुर्दशी! बाप्पाला निरोप देण्याचा दिवस बघता बघता उभा ठाकला आणि गेले ५ महिने कोरोनाच्या कहराच्या दहशती खाली जात असताना गणेशोत्सवाच्या काळात मात्र काहीसं वातावरण बदलून गेलं होत. संस्कृतीचा वारसा लाभलेल्या पुण्यासह राज्यभरात भव्य-दिव्य मिरावणुकींनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो, ती भव्यता जरी यंदा नसली तरी भक्तिभावात मात्र कोणतीही कमी नाही.
इम्तियाज जलीलांची मंदिर प्रवेशावरून अखेर माघार!
देशासह अन्य राष्ट्रातील भक्त असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे देखील आज विसर्जन पार पडणार असून दरवर्षी रात्री उशिरा दिमाखात निघणारी मिरवणुक यंदा मात्र नसणार आहे. पुण्यातील सर्व मंडळांनी कृत्रिम हौदात विसर्जन करावे अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली होती. त्यानुसार संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांच्या मुहूर्तावर मंदिर परिसरातच कृत्रिम हौदात श्रींचे विसर्जन पार पडणार असल्याची माहिती ट्रस्टने दिली आहे.
हिंदु मंदिरं खुली करण्यास आम्ही समर्थ ; चंद्रकांत खैरेंचा घणाघात


