टीम महाराष्ट्र देशा : पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्यांकडून सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तर पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शुक्रवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.
गुरुवारी दुपारी ३:२५ वाजता जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. तब्ब्ल २०० किलो वजनाच्या स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४२ जवान शाहिद झाले असून २० जवान जखमी झाले.
दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील तीव्र शब्दात या हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. सगळे जग आपल्या पाठीशी आहे आणि आता हीच वेळ आहे पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना धडा शिकवण्याची अशा तीव्र शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर आता प्रचार, निवडणुका सोडा आधी त्यांना उत्तर द्या, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला सुनावलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

