चेन्नई : ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार हे ठरलेले आहे.
दरम्यान, प्रसिद्ध भारतीय समालोचक आणि भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्रा याने आपल्या ‘आपके सवाल मेरे जवाब’ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसंदर्भात मत व्यक्त केले. चोप्रा यांच्या म्हणण्यानुसार ‘भारतीय संघाची मजबूत भिंत’ म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा हा आगामी कसोटी मालिकेचा ‘ट्रम्प कार्ड’ आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा पुजाराची भूमिका या मालिकेत महत्त्वाची ठरणार आहे. आपल्या योग्य खेळीने तो सर्वांचे मन जिंकून घेईल आणि रोहित- विराटपेक्षा देखील अधिक धावसंख्या उभारेल, अशी चोप्रा यांना खात्री आहे. तर दुसरीकडे सर्वाधिक विकेट घेण्याची जबाबदारी आर अश्विनच्या खांद्यावर असेल असे देखील त्यांचे म्हणणे आहे.
सर्वात विश्वासार्ह खेळाडू म्हणून पुजारा यांचे वर्णन करताना त्याला ‘न्यू वॉल ऑफ इंडिया’ असे संबोधले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी म्हटले की, “चेतेश्वर पुजारा भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करेल ही आश्चर्याची बाब नाही. तो रोहित तसेच विराटला मागे टाकण्याची दाट शक्यता आहे. तो सर्वांपेक्षा जास्त वेळ फलंदाजी करेल. म्हणजेच सर्वाधिक चेंडू खेळेल. सोबतच सर्वाधित धावाही करेल.”
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवणारे तुम्ही कोण?; रुपाली चाकणकर यांचा कंगणावर निशाणा
- खडसेंची अटक टळणार का ? ; आज होणार सुनावणी
- ऑलिम्पिकची तयारी सुरू; जपानमध्ये मात्र स्पर्धेलाला विरोध !
- राहुल गांधींच्या ‘त्या’ प्रश्नावर भाजपने काढला राहुल यांचा खापर पणजोबा!
- मोठी बातमी : काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली

