🕒 1 min read
पुणे- राज्य सरकारच्या भोंगळ कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय येत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSC ची नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च रोजी नियोजित असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्यात आली आहे.
आयोगाने त्या संबंधीची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी जारी केली आहे.आयोगाने दिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनच वेगवेगळ्या जिल्हयांनी निर्बंध लावलेले आहेत. प्रस्तुत परीक्षेची सुधारित तारीख जाहिर करण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
दरम्यान,महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं विद्यार्थी संतप्त झाले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले आहेत.राज्यसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ते करत असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेवून पुण्यातील नवी पेठेत ठिय्या मांडला आहे.
ग्रामीण भागातून पुण्यात अभ्यास करण्यासाठी आलेले हजारो विद्यार्थी आज पुण्यात आक्रोश व्यक्त करत आहेत.यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमार देखील केला आहे.सरकार वय वाढवून देत आहे मात्र महिनाभराचा खर्च जवळपास १० हजार रुपये असल्याने तो कसा करायचा असा देखील प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे.लोकलमध्ये लाखो लोक दाटीवाटीने प्रवास करतायत, अधिवेशनही झालं, काँग्रेसच्या आंदोलनात लाखो लोकं होते,वरळीत पब सुरू, परीक्षाही घेता आल्या असत्या…विद्यार्थ्यांचा उद्रेक साहजिक आहे, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आघाडी सरकार खेळत आहे. समन्वय राखून ह्या परीक्षा घेण्याची गरज होती असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- रोहित शर्माने दिली टीम इंडियाची सगळ्यात मोठी अपडेट
- ‘तुफान’ची रिलीझ डेट जाहीर; ‘तुफान उठेगा’ म्हणत फरहानने केले टि्वट
- लोकं काही सुधारेनात…नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर… अनेक शहरात कडक निर्बंध लागू
- बीएमडब्ल्यूने लाँच केली भारतीय बनावटीची पहिली कार
- दोन दुचाकीसह चोरट्यांनी कार लांबवली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
