🕒 1 min read
मुंबई : बॉलीवुडचा आघाडीचा दिग्दर्शक-अभिनेता फरहान अख्तरने बुधवारी त्याच्या ‘तुफान’ या चित्रपटाच्या रिलीज डेट ची घोषणा केली. कोरोना संसर्गामुळे या चित्रपटाची शुटींग रखडले होते. तुफान उठेगा असे टि्वट करत फरहानने आपल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटाचा टिझर १२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
फरहान अख्तर तुफान चित्रपटात बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी फरहानने खूप मेहनत घेतली आहे. त्याने या भूमिकेसाठी सहा आठवड्यात तब्बल १५ किलो वजन वाढविले होते. तुफान हा सिनेमा येत्या २१ मे रोजी अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
Toofaan Uthega! Catch the teaser on 12th March at @PrimeVideoIN
❤️ or ???? this tweet to set a reminder for the teaser premiere. #ToofaanOnPrime.
World premiere – May 21@excelmovies @ROMPPictures @mrunal0801 @SirPareshRawal @hussainthelal @ritesh_sid @RakeyshOmMehra pic.twitter.com/xgCVoWC7u3— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) March 10, 2021
या चित्रपटात फरहान अख्तर शिवाय परेश रावल, मृणाल ठाकूर, सुप्रिया पाठक, हुसैन दलाल असे कलाकार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे. फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा हा एकमेकासोबत दुसरा सिनेमा आहे. याआधी दोघांनी २०१३ मध्ये प्रदर्शित ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमात एकत्र काम केले होते.
महत्वाच्या बातम्या
- बीएमडब्ल्यूने लाँच केली भारतीय बनावटीची पहिली कार
- दोन दुचाकीसह चोरट्यांनी कार लांबवली
- सचिन म्हणतो, किती अंडी खावी लागतील ?
- कार खरेदी करताय ! हुंदाई च्या या गाड्यांवर मिळावा तब्बल 1.5 लाख रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट
- मोठी बातमी : राज्यातील ‘या’ शहरात १५ तारखेपासून कडक लॉकडाऊन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
