Share

नागपूर महापालिकेतील ‘मुंढे’ करंट कायम, नवीन आयुक्तांनी बजावली ६६ कर्मचाऱ्यांना ‘शो कॉज’ नोटिस

Published On: 

नागपूर : तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लागली होती. त्यांची बदली झाल्यानंतर नवीन आयुक्त कसे येतात, याकडे महापालिकेसह संपूर्ण शहराचे लागले होते. पण नवीन आयुक्त राधाकृष्ण बी. आले, कार्यभार स्विकारला आणि सुरूवातीलाच त्यांनी ६६ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे तुकाराम मुंढे बदलून गेले नाहीत, तर ते अजूनही येथेच असल्याचा भास होतोय, अशा प्रतिक्रिया उमटल्या. महापालिकेत बेशिस्त अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच नवीन आयुक्तांना या कारवाईतून दिलेला आहे.

नागपूर महानगरपालिका सिव्हील लाईन मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या ६६ कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ‘कारणे दाखवा’नोटीस बजावली आहे. आयुक्तांच्या सुचनेवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही विभागांना आकस्मिक भेट दिली असता काही कर्मचारी उशिरा आल्याचे आणि काही कर्मचारी विनामंजुरी सुटीवर असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली.

काल मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यालयातील काही विभागांना आकस्मिक भेट देण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून संबंधित अधिकाऱ्यांनी मनपा मुख्यालयातील वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता कर विभाग, नगररचना विभाग, विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागाची पाहणी केली. या आकस्मिक पाहणीत या विभागातील काही कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर झाले नसल्याचे निदर्शनास आले.

इतकेच नव्हे तर काही कर्मचारी रजेवर होते. चौकशी केली असता त्यांनी रजेचा कुठलाही अर्ज दिलेला नव्हता अथवा त्यांच्या रजेला पूर्वपरवानगी नव्हती. अशा कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ६६ होती. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. आयुक्तांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून त्या सर्व ६६ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश दिले. आयुक्तांच्या आदेशानुसार सदर नोटीस बजावण्यात आले.

वेळेवर उपस्थित न झाल्यास कारवाई : आयुक्त

कार्यालयात वेळेत उपस्थित होणे हा कार्यालयीन शिस्तीचा भाग आहे. त्यात कुठलीही कसूर चालणार नाही. त्यामुळे मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नियमित वेळेत कार्यालयात उपस्थित राहावे. यात कुठलीही हयगय होता कामा नये. यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे. शिवाय रजेवर जाताना नियमानुसार मंजुरी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘त्या’ कोव्हिड सेंटरचे उद्घाटन करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा राजीनामा हीच खरी श्रद्धांजली! : नितेश राणे

माफ कर मित्रा,आम्ही तुला वाचवू शकलो नाही- सत्यजित तांबे

देवेंद्र फडणवीसांनी केले महा आघाडीवर गंभीर आरोप, कुठे होतोय ५०० कोटींचा ख़र्च तुम्हीच बघा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!