Share

PSL 2022: मुलतान सुल्तानसला पराभूत करत लाहोर कलंदर्स पहिल्यांदाच ठरले पीएसएलचे विजेते

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पाकिस्तान सुपर लीगला यावेळी नवा चॅम्पियन मिळाला आहे. प्रोफेसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद हाफीजच्या (mohmmad hafis) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर लाहोर कलंदर्सने रविवारी रात्री गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मुलतान सुलतान्सचा ४२ धावांनी एकतर्फी पराभव करून प्रथमच पीएसएलचे विजेतेपद पटकावले आहे.

मुलतानच्या (multan sultans) संघाने गटातील १० पैकी ९ सामने जिंकले. मात्र अंतिम फेरीत प्रोफेसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाफिजने त्याला मागे टाकले. प्रथम फलंदाजी करताना लाहोर कलंदरने (lahor qalandars) २० षटकांत ५ बाद 180 धावा केल्या. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र हाफिजने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत ४६ चेंडूंत नऊ चौकार आणि एक षटकार खेचत ६९ धावांची सर्वोत्तम खेळी खेळत संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. त्याच्याशिवाय हॅरी ब्रूकने २२ चेंडूत ४१ तर डेव्हिड व्हिसाने ८ चेंडूत २३ धावा केल्या.

लाहोरच्या घातक गोलंदाजीसमोर मुलतानचा संघ असहाय्य दिसत होता.मुलतान सुल्तान केवळ १३८ धावांवर परास्त झाले. मुलतानकडून खुशदिल शाहने ३२ धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार मोहम्मद रिझवानला केवळ १४ धावा करता आल्या. फलंदाजीत चमकदार कामगिरी करणाऱ्या हाफिजनेही अप्रतिम गोलंदाजीही केली. त्याने चार षटकांत केवळ २३ धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय शाहीन शाह आफ्रिदी आणि जमान खानने दोन विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!