Share

महाजन हे महान नेते ! संजय राऊतांचा उपरोधिक टोला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर अनेक नेते भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांच्या संपर्कात आहेत. यावरून शिवसेनचे खा. संजय राऊत यांनी महाजन हे महान नेते आहेत, असा उपरोधिक टोला लगावला आहे.

निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश करत आहेत. असे पक्षांतर लोकसभा निवडणुकीला देखील पाहिला मिळाले. त्यामुळे आता निवडणुका येताचं इतर पक्षातील नेत्यांनी भाजपकडे मोर्चा वळवणे हे काही नवीन नाही. मात्र आता या पक्षांतरावरून शिवसेना आणि भाजपमध्ये टोलेबाजी पाहिला मिळत आहे. भाजप नेत्यांकडून अनेकदा इतर पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला जातो. तर हा दावा खासकरून गिरीश महाजन हे वारंवार करत असतात. यावरून संजय राऊतांनी चांगलीचं टोलेबाजी केली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकांना आता काही काळ शिल्लक राहिला आहे. मात्र त्या पूर्वीच काँग्रेस – राष्ट्रवादी पक्ष खिळखिळा झाला आहे. सत्ता असताना केलेले घोटाळे झाकण्यासाठी आणि आपल्यावर कोणत्याही चौकशीची टांगती तलवार असू नये, यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. तसेच राष्ट्रवादीचे अनेक नेते काही दिवसातचं भाजपात प्रवेश करणार आहेत.राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. तर शिवेंद्रसिंहराजे भोसले, गणेश नाईक, या धुरंधर नेत्यांची नाव देखील भाजप प्रवेशासाठी चर्चेत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!