Share

‘पिकांच्या नुकसानाचे युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सर्वत्र परतीचा पाऊस लांबल्याने व जोरदार बरसल्याने काढणीला आलेल्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे खरिपाची पिके सडून गेली आहेत. किडीचा प्रादूर्भावही वाढला आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे युद्धपातळीवर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी बीडचे नवनिर्वाचित आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

ते म्हणाले की, सरकारने पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी जिल्हा प्रशासनाकडे ते अद्याप पोहोचलेले नाहीत. त्यामुळे पंचनाम्याच्या कामाला सुरवातही झालेली नाही. तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळू शकेल.

दरम्यान, राज्यात परतीच्या पावसाने थैमान केले आहे. अखेर दिवाळीत देखील जोरदार वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने बाजारपेठांवर देखील याचा परिणाम झालेला दिसत आहे. परतीच्या पावसाचा मोठा फटका भात शेतीला बसला आहे. काढणीला आलेले भात पावसाने खराब होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1188013321225555968?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1188007152440377345?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!