Share

आगर नांदर गावाला मूलभूत सुविधा पुरविणार; रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांची ग्वाही!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील पुनर्वसित झालेल्या आगर नांदर या गावासाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे (Sandipan bhumre) यांनी येथील ग्रामपंचायतच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. आगर नांदर हे गाव पुनर्वसित आहे शासनाने नुकत्याच या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायती निर्मिती केली आहे.

ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. या नव्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन रोजगार व मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाले. याप्रसंगी दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे, शेतकरी खरेदीत संघाचे चेअरमन बाबुराव पडोळे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलतांना संदिपान भुमरे म्हणाले की या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वॉटर ग्रीड योजनेतून लवकरच मार्गी लागणार या माध्यमातून गावकऱ्यांना शुद्ध फिल्टर पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

तसेच गावातील रस्त्यांची कामे,गटारींची कामे,ग्रामपंचायतच्या नव्या ईमारतीसाठी तसेच गावातील मूलभूत सुविधा सोडण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यापूर्वी आपण आपेगाव येथील गोदावरीच्या काठी संरक्षण भिंत बांधण्याचे व स्मशानभूमीचा विकास करण्याचे आश्वासन दिले होते ते शब्द पाळले असल्याचे सांगितले. कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!