🕒 1 min read
नवी दिल्ली : न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशननं रिपब्लिक टिव्हीची आयबीएफ सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच अनेक महिन्यांपर्यंत बनावट पद्धतीनं रिपब्लिक टिव्ही पाहणारे अधिक लोकं असल्याचे दाखवण्यासाठी दोघांमध्ये संगनमत झाल्याचं स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरू असताना अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियातून व्हायरल झालं. या चॅटमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
गोस्वामी-दासगुप्ता यांच्यातील चॅटवर एनबीएने आश्चर्य व्यक्त केलं आहे. चॅटसंदर्भात सविस्तर पत्रक एनबीएकडून प्रसिद्ध करण्यात आलं असून, रिपब्लिक वृत्तवाहिन्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवर जोर देण्यात आला आहे.
‘हे व्हॉट्सअॅपवरील मेसेज ना केवळ रेटिंगमधील हेराफेरी दर्शवतात तर यावरून सत्तेचा खेळही दिसून येतो. संदेशांच्या देवाणघेवाणीमध्ये सरकारमध्ये सचिवांची नियुक्ती, मंत्रिमंडळात बदल, पीएमओपर्यंत पोहोच, तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयापर्यंत कामकाजावर प्रकाश पडत आहे. यावरून एनबीएद्वारे गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या आरोपांना दुजोरा मिळत आहे,’असंही एनबीएनं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे नंतर महाराष्ट्र; मुश्रीफांचा पाटलांना टोला
- असमानतेचा सामना करून अखेर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी संघर्षाचा शेवट गोड केला !
- विमानतळाचे नाव होणार छत्रपती संभाजीराजे विमानतळ-अतुल सावे
- ग्रामसभा पूर्ववत सुरु करण्यास संमती; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा महत्वपूर्ण निर्णय
- ‘गद्दारी करून ठाकरे सरकार मध्ये बसलेत,त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
