🕒 1 min read
औरंगाबाद : वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरामध्ये गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना आक्रमक झाली असून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान पुन्हा एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे. महाराष्ट्रातील मोठा प्रकल्प केंद्राकडून नामंजूर करण्याच आला आले. बिडकीन येथील प्रस्तावित मेडिकल डिव्हाईस पार्क केंद्राकडून नामंजूर करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे सरकार आमने-सामने आले आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘महाराष्ट्र देशा’सोबत बोलताना शिंदे सरकारवर टीका केली आहे.
अंबादास दानवे म्हणाले, “मेडिकल डिव्हाईस पार्क बिडकीन एमआयडीसीच्या ऑरिक सिटी भागात होणार होता. तत्कालीन सरकारने बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाईस पार्क संदर्भात एकाचवेळी प्रस्ताव सादर केले होते. राज्य सरकारने हे प्रस्ताव केंद्राकडे पाठवले होते. पण केंद्र सरकारने महाराष्ट्राचा प्रस्ताव नामंजूर केला. तर चार राज्यांमध्ये हा प्रकल्प देण्यात आला. या संदर्भात खासदार प्रियंका चतुर्वेदी आरोग्यमंत्र्यांना विचारणा केली पण त्यांनी सुस्पष्टपणे महाराष्ट्राचा समावेश नाही, असे सांगितले.”
महाराष्ट्राचे खच्चीकरण-
“त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे बोलतात पुरावा दाखवा, तर हा महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाचा प्रस्ताव होता. जो केंद्राने नाकारला आहे. महाराष्ट्रात कशाप्रकारे उद्योगधंदे येणार नाहीत, महाराष्ट्राचे कसे खच्चीकरण होईल, अशाच पद्धतीने दिल्लीची सत्ता काम करते. तसेच राज्यातील सरकार देखील या सगळ्या कामाला मदत करते,” असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. ते ‘महाराष्ट्र देशा’सोबत बोलत होते.
आदित्य ठाकरे यांचे ट्विट-
रविवारी आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले की, “वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का?”
मेडिकल डिव्हाइस पार्कला का मंजुरी मिळाली नाही?-
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, “केंद्र सरकारच्या बल्क ड्रग पार्क धोरणांतर्गत मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान देण्याची योजना आहे. त्याअंतर्गत औरंगाबादमध्ये मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्याची विनंती मी केंद्र सरकारकडे केली होती. मी राज्यसभेत विशेष उल्लेख प्रस्तावाअंतर्गत या प्रकल्पासाठी अनुदानाची विनंती केली होती. यानंतर आता केंद्र सरकारने महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी अनुदान देण्यास नकार दिला आहे. केंद्रीय आरोग्य आणि रसायन मंत्री मनसुख मांडविया यांनी मला पाठवलेल्या पत्रात मला सांगण्यात आले आहे की 16 राज्यांनी या प्रकल्पाची मागणी केली होती. त्यानंतर हा प्रकल्प 4 राज्यांना मंजूर करण्यात आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही. मेडिकल डिव्हाइस पार्क प्रकल्पाला कोणत्या आधारावर मंजुरी मिळाली नाही हे केंद्र सरकारने सांगावे?”
मंजुरीबाबत मला एक तरी पत्र दाखवा- फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी मेडिसिन डिव्हाईस पार्क प्रकल्पाच्या मंजुरीबाबत मला एक तरी पत्र दाखवा. ज्यावरून महाराष्ट्रात मेडिसिन डिव्हाईस पार्क प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आल्याचे दिसून येईल. आदित्य ठाकरे हे बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांनी मेडिकल डिव्हाइस पार्क प्रकल्पाच्या मंजुरीबाबत पुरावा दाखवावा.”
इतर राज्यात गेलेला तिसरा मोठा प्रकल्प-
औरंगाबाद येथील ऑरिक सिटी येथे 424 कोटींचा वैद्यकीय उपकरणे पार्क प्रस्तावित होता. वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्कनंतर महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेला हा तिसरा मोठा प्रकल्प आहे. राज्याकडून योग्य पद्धतीने प्रस्ताव सादर न केल्याने प्रकल्प नामंजूर करण्यात आला, अशी टीका शिंदे सरकारवर होत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bikes Comparison | ‘या’ दोन हिरो बाइक्स इतक्या कमी किमतीत आहेत उपलब्ध, कोणती सर्वोत्तम असेल जाणून घ्या!
- Supriya Sule | … म्हणून सुप्रिया सुळेंच्या चालू कार्यक्रमात दोन गट एकमेकांना भिडले
- Medical Device Park | मेडिकल डिव्हाईस पार्क जात असताना संदिपान भुमरे काय करत होते?
- Medical Device Park | आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर! फडणवीस म्हणतात पुरावा दाखवा, शिंदे सरकारचं चाललंय काय?
- iPhone 13 Pro Discount | iPhone 13 Pro Max वर बंपर डिस्काउंट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
