Share

Supriya Sule | … म्हणून सुप्रिया सुळेंच्या चालू कार्यक्रमात दोन गट एकमेकांना भिडले

Published On: 

🕒 1 min read

पुणे : भाजप नेत्या तसेच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामती तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. यावेळी दोन गटांमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासमोरच गोंधळ घातला. या घटनेने राजकीय वर्तुळात चांगलीच खरबळ उडाली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात वाद:

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामती तालुक्यात गावांना भेटी दिल्यात यावेळी डोर्लेवाडी गावात गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातून राज्यमार्गाचं काम सुरू आहे. या ठिकाणी दहा मीटर रुंदीकरण प्रस्तावित असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये वाद आहेत. सदरचा रस्ता सात मीटरचा करण्यात यावा, अशी एका गटाची मागणी आहे. तर दहा मीटरचा रस्ता बनवा, अशी दुसऱ्या गटाकडून मागणी आहे. यावरुनच सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रामत या वादाला तोंड फुटलं.

जेजुरी ते निरा, नरसिंहपुर रस्ता डोर्लेवाडी गावातून जातो. गावठाणात रस्ता रुंदीकरण दहा मीटर व्हावाकी सात मीटर यावरूनच गावकऱ्यांमध्ये वाट पेटला.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन यावेळी दिलं आहे. तसेच त्यांच्या या आश्वासनावर गावकऱ्यांनी संमती देखील दर्शवली आहे. सुप्रिया सुळे यांनी यावेळी सर्व ग्रामस्थांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!