Share

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकर तानाजी सावंतांवर संतापल्या, म्हणाल्या – “नालायक मंत्र्यांना…”

Published On: 

मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. एवढंच नाही तर त्यांनी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावरुन शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया :

मीही मराठा समाजातून येते. नालायक आणि चुकीचं वर्तन करणाऱ्या मंत्र्यांना त्यांनी जी भाषा वापरली त्याच भाषेत मराठा समाज उत्तर देईल, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. आधी तुम्ही एवढं बोलत होता, आता तुम्ही सत्तेत आहात, तर मग तुम्ही द्या मराठा समाजाला आरक्षण, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

काय म्हणाले तानाजी सावंत :

यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे, असं तानाजी सावंत म्हणाले. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचं देखील सावंत म्हणाले.

दरम्यान, तानाजी सावंतांनी माफी मागितली असून त्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, 2024 पर्यंत आरक्षण नाही मिळालं तर हा तानाजी सावंत आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा समाजाबरोबर मोर्चात तुमच्याबरोबर शामिल होईल, असं आश्वासन तानाजी सावंत यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!