Share

१४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजातून ग्रामीण भागासाठी २२ रुग्णवाहिकांची खरेदी

Published On: 

औरंगाबाद : ग्रामीण भागामधील रुग्णांना तातडीने उपचारासाठी नेता यावे, यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजामधून प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी २२ रुग्णवाहिका खरेदीसह २६ हुन अधिक विषयांना जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडली. अध्यक्षांच्या दालनात झालेल्या सभेत उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, सभापती अविनाश गलांडे, किशोर बलांडे, मोनाली राठोड, अनुराधा चव्हाण यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. तर इतर सदस्य ऑनलाईन उपस्थित होते. परत जात असलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या रकमेमधून २२ रुग्णवाहिका घेण्याचा ठराव आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी मांडला. त्याला बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी अनुमोदन दिले. या ठरावामुळे आरोग्य केंद्रांना २२ रुग्णवाहिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वैजापूर तालुक्यातील मनूर, गंगापूर तालुक्यातील काटे पिंपळगाव, नेवरगाव येथील जुने झालेले जलकुंभ, बाळापूर येथील प्राथमिक शाळेची इमारत तसेच इतर जीर्ण झालेल्या इमारती पाडण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाच्या रकमेतून प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक साहित्य व यंत्रसामुग्री खरेदीकरिता शासनाकडे प्रस्तावास मान्यता व निधी उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसाठी अग्निरोधक स्मोकडिटेक्टर व भूकंपमीटर यंत्र सामुग्री खरेदीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!