मुंबई : राज्यपालांना सहीचा प्रॉब्लेम आहे, म्हणूनच त्यांनी अजूनही आम्ही दिलेल्या १२ आमदारांच्या नियुक्त्या केल्या नाहीत. अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान राज्यपाल सदस्य नियुक्तीवरून राऊत यांनी नेहमीच टीका-टिप्पणी केली आहे.
आम्ही दिलेल्या १२ आमदारांच्या नियुक्त्या का थांबल्यात? तुम्ही घटना कोणाला शिकवताय? आमच्यासारखं घटनेचं पालन करणारं कोणी नाही. असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाना साधला आहे. सरकारने शिफारस केलेले १२ सदस्य विधान परिषदेत जाऊ नयेत असे भाजपला वाटत आहे. आपल्या मर्जीतील सदस्यांची नियुक्ती भाजपला करायची आहे, त्यामुळेच या नियुक्त्या रखडल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आमदारांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास सक्षम नसल्याचे राज्यपालांनी सरकारला स्पष्ट केले आहे. तसेच १२ सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. अशी माहिती मिळते आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची; जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा’
- ‘कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार’
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप
- पन्नास लाखांसाठी तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार – चंद्रकांत पाटील
- चित्रा वाघ यांनी जाळले मुख्यमंत्र्यांचे पत्र; म्हणाल्या, हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

