🕒 1 min read
दिल्ली: काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या आणि महासचिव असलेल्या प्रियंका गांधी यांना त्यांचा सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे पत्र पाठवण्यात आलं होतं. यावरुन काँग्रेस नेत्यांनी हा राजकीय सूड असल्याचं सांगत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान, नुकतंच आणखी काही दिवस त्या बंगल्यात राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं. आता यावर खुद्द प्रियंका गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं असून, अशी कोणतीही मागणी आपण केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
“मी अशाप्रकारची कोणतीही विनंती सरकारकडे केली नाही. मला १ जुलै रोजी बंगला रिकामा करण्याचं पत्र देण्यात आलं. त्यानुसार मी १ ऑगस्ट रोजी ३५ लोधी इस्टेटमधील माझा सरकारी बंगला रिकामा करणार आहे,” असं प्रियंका गांधी म्हणाल्या. प्रियांका गांधी यांनी ट्विटरवरून या पसरत असलेल्या चुकीच्या वृत्तावर खंडन केलं आहे.
This is FAKE NEWS.
I have not made any such request to the government. As per the eviction letter handed to me on the 1st of July, I will be vacating the government accommodation at 35 Lodhi Estate by the 1st of August.https://t.co/GkBO5dkaLs
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 14, 2020
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमध्ये शासकीय बंगला देण्यात आलेला होता. मागील वर्षी प्रियंका वाड्रा यांची विशेष सुरक्षा काढून त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली होती. नियमांनुसार सुरक्षा व्यवस्था पुरवताना विशेष सुरक्षा पुरवली जाईल त्याला सरकारी बंगल्याची तरतूद आहे. मात्र, झेड सुरक्षा व्यवस्थेत सरकारी निवासस्थानाची तरतूद नाही. याचाच आधार घेऊन प्रियंका गांधी यांना ही नोटीस देण्यात आली आहे.
अशोक गेहलोत यांची गुलामी मान्य नाही,पायलट समर्थक आमदारांचा एल्गार
सरकारी आदेशानुसार प्रियंका गांधी यांना १ ऑगस्ट २०२० पूर्वी हा सरकारी बंगला सोडावा लागेल. त्यांना देण्यात आलेल्या अधिकृत नोटीसमध्ये त्यांनी निश्चित वेळेत बंगला रिकामा न केल्यास त्यांना आर्थिक दंडही होऊ शकतो. काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावरून मोदी सरकारवर टीका केली होती. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते, मोदी सरकारने हा निर्णय सुढबुद्धीने घेतलेला आहे.
शिवसेनेचे नगरसेवक फोडल्यानंतर आता राष्ट्रवादीचा डोळा कॉंग्रेसच्या बड्या नेत्यावर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

