🕒 1 min read
सांगली : पारनेर मधील पाच नगरसेवकानीं शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रेवश केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. यावरून महाविकास आघाडीत वाद सुरु झाल्यानंतर पुन्हा त्या नगरसेवकांना शिवसेनेकडे सोपवण्यात आले होते. त्यानंतर महाविकास आघाडीत परस्पर पक्षाच्या नेत्यांना प्रवेश द्यायचा का ? यावर विचार झाल्याची बातमी असली तरी आता महाविकास आघाडीतील घडक असणाऱ्या कॉंग्रेसच्या बड्या नेत्यावर राष्ट्रवादीचा डोळा असल्याचे समोर आले आहे.
काँग्रेसनेत्या जयश्री पाटील या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने हा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरून ग्रिन सिग्नल मिळाल्याचे समजते. दरम्यान, अंतिम निर्णयासाठी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. लवकरच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते.
गुगलने हटवले ‘११’ धोकादायक ऍप, युझर्सलाही तातडीने हटवण्याचा सल्ला
काँग्रेसनेते डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील यांच्या पश्चात शहरात काँग्रेसला बळ देण्याचे काम जयश्री पाटील यांनी केले. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीसह पक्षाच्या विविध पातळीवर कार्यक्रम, आंदोलनात त्या सहभागी असतात. गेल्या महापालिका निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्थापनेपासून ते निवडणूक प्रचारातही त्यांनी आघाडी सांभाळली होती. परंतु, त्या तुलनेत काँग्रेसमधून त्यांना व कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नाही अशी खदखद होती. कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून बळ न दिल्याने विकासकामे होत नसल्याचीही खंत व्यक्त होत आहे. एकूणच या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांतून राष्ट्रवादी प्रवेशासाठी त्यांच्याकडे आग्रह सुरू आहे. याबाबत अनेकवेळा चर्चाही झाली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अर्थमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही चर्चा झाल्याचे समजते. आता कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्रवादीत जाऊ’, असा आग्रह धरला आहे. सोमवारी काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना जयश्री पाटील यांनी बोलावून तसे स्पष्ट संकेतही दिले. मंगळवारी पुन्हा नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानुसार चार दिवसांत निर्णय होणार आहे.
गणेशोत्सवास परवानगी दिली तशी बकरी ईदलाही द्या, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

