🕒 1 min read
जयपूर- राजस्थानमध्ये सत्तासंघर्षाचा पेच अद्याप कायम असून काँग्रेस पक्षाने मंगळवारी म्हणजेच आज पुन्हा एकदा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचं आवाहन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदारांना केलं आहे.
उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा आहे. मात्र, राजस्थान प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात असलेल्या बंडखोर भूमिकेवर ठाम असल्याचे पायलटच्या जवळच्या सूत्रांचं म्हणणं आहे.
राजस्थानमध्ये कॉंग्रेसमध्ये सुरू झालेली सत्ता संघर्ष अद्याप संपलेला नाही. बंड करून दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची समजूत काढण्यात काँग्रेस हायकमांड व्यस्त आहे.मात्र, सचिन पायलट यांचे समर्थक असलेले आमदार अशोक गहलोत यांच्यावर टीका करत आहेत. मुकेश भाकर यांनी सोमवारी रात्री ट्विट करत गेहलोत नेतृत्व आम्हाला मान्य नाही असं म्हटलं आहे.
" जिंदा हो तो जिंदा नजर आना जरूरी है
उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है"कांग्रेस में निष्ठा का मतलब है अशोक गहलोत की गुलामी।
वो हमें मंजूर नहीं।— Mukesh Bhakar (@MukeshBhakar_) July 13, 2020
दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा करून मनधरणीचा प्रयत्न केला. पण, पायलट यांनी पक्षात परत येण्यास नकार दिला. पायलट यांनी अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, पण गहलोत यांना मुख्यमंत्रिपदी ठेवू नका, अशी मागणीच पायलट यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
गणेशोत्सवास परवानगी दिली तशी बकरी ईदलाही द्या, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पत्रास करण की… फडणवीसांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र !
‘जोपर्यंत आमदारांची डोकी नीट मोजली जात नाहीत, तोपर्यंत भाजप उघडपणे पुढे येऊन काही करणार नाही’
‘जोपर्यंत आमदारांची डोकी नीट मोजली जात नाहीत, तोपर्यंत भाजप उघडपणे पुढे येऊन काही करणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

