Share

‘प्रियांका गांधींना ३० तासांपासून कोठडीत ठेवले मग मंत्र्याच्या मुलाला अजून अटक का नाही?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: लखीमपूरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर शेतकऱ्यांना भेटायला निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना तेथील प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यावेळी पोलिसांशी त्यांची झटापटही झाली. त्यांना हरगाव पोलीस स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे. गेल्या ३० तासांपासून प्रियांका गांधींना बंदिस्त ठेवले आहे. यावरूनच आता काँग्रेस नेते तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी योगी सरकारला संतप्त सवाल केला आहे.

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींना गेल्या ३० तासांपासून कोठडीत ठेवले आहे. मग मंत्र्याच्या मुलाला अजून अटक का नाही? असा संतप्त सवाल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. तर ज्यांनी अन्नदात्यांना कारने चिरडले त्यांना अटकही झाली नाही. आणि त्यांचे अश्रू पुसणाऱ्या श्रीमती प्रियंका गांधी यांना 30 तासांपासून कोठडीत ठेवलेय. ना गुन्हा सांगितला, ना न्यायालयात सादर केले. हेच आहे काय योगी-मोदींचे राम राज्य? असा सवाल कॉंग्रेसचे जनरल सेक्रेटरी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करत केला आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपुर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये तर जखमींना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र या घटनेनंतर देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर प्रियांका गांधींच्या अटकेनंतर भाजपवर कडाडून टीका केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!