पुणे : राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र राजकीय पक्ष मात्र राजकारण करण्यात दंग असल्याचे चित्र आहे. गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपने काही पक्ष प्रवेश घडवून आणले होते आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष देखील याच मार्गाने जाताना दिसत आहे.
चित्रपट निर्मात्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील ‘निसर्ग’ येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार आहे.
बेर्डे यांच्या समवेत अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेते विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर, ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुहासिनी देशपांडे कार्यकारी निर्माते संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक अभिनेते डॉक्टर सुधीर निकम, अखिल भारतीय चित्रपट मउहामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, हे सर्वजण राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागांमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली.
राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये ज्यात साहित्यिक, कलाकार, क्रीडा अशा क्षेत्रातील दिग्गजांना संधी देण्यात येते. या निमित्ताने प्रिया बेर्डे यांना ही संधी मिळू शकते का? अशी चर्चा सध्या सुरु आहे.
कोरोनामुक्त झाला म्हणून डीजे लाऊन केलं स्वागत,मित्रमंडळी अडकले कायद्याच्या कचाट्यात
ब्रेकिंग: रविकांत तुपकर यांची स्वाभिमानीत घरवापसी
अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ संपवा, देवेंद्र फडणवीसांची आक्रमक मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

