मुंबई : राज्यात सध्या अंतिम वर्षांच्या परीक्षांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला राज्यपालांसह भाजपा तसेच अन्य काही संघटनांनी विरोध केला आहे. त्यातच आता शैक्षणिक संस्थाही या निर्णयाविरोधात उभ्या ठाकल्या आहेत.
माता न तू वैरिणी : चार महिन्यांच्या बाळाला सोडले रस्त्याकडेला
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेतल्यास त्यांच्यावर ‘कोरोना बॅच’चा शिक्का बसेल. पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश तसेच नोकरीमध्ये त्यांना अडचणी निर्माण होतील. त्यामुळे विद्यार्थी हितासाठी या परीक्षा घ्यायला हव्यात. त्याचप्रमाणे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा यंदा रद्द करून पूर्वीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका पुण्यातील काही शिक्षणसंस्थांनी घेतली आहे.
दरम्यान, या वादात आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उडी घेतली आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले, विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ हा राज्य सरकारची अनिर्णीत राहण्याची स्थिती आणि अनेक पॉवर सेंटर यामुळे निर्माण झाला. परीक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, राज्यपालांना आहे असे मत राज्याच्या विधी व न्याय विभागाने दिले असल्याची माझी माहिती आहे. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे काय हे सरकारने ठरवायला हवे. अमुकच निर्णय घ्या असे आमचे म्हणणे नाही परंतू एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसह सर्वांबाबत तत्काळ निर्णय घ्या एवढाच आमचा आग्रह आहे.
‘पंडित नेहरूंना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले तरी जवानांचे बलिदान सार्थकी लागेल’
दरम्यान, याच निर्णयावर आमदार आशिष शेलार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. शेलार म्हणाले,एका राजकीय पक्षाची युवा संघटना सरकारला बेकायदेशीर निर्णय घेण्यास भाग पाडते आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. अंतिम वर्षे पदवी परिक्षांबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन 12 प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरे द्या, मग निर्णयावर बोलू. पण सरकारने त्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीच शिवाय मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ ही दिली नाही. म्हणून आम्ही राज्यपालांना भेटलो. एटीकेटी असलेल्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थीना नापास करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. एका पिढीचे नुकसान केले जाते आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

