Share

‘कोरोना’च्या लढाईत खासगी वैद्यकीय क्षेत्राचेही सहकार्य हवे’

Published On: 

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाने चांगलेच हात पाय पसरले आहेत. तसेच या संकटकाळी कोरोनाच्या भीतीने खासगी दवाखानेही बंद आहेत. यामुळे खासगी दवाखान्यांचा भार देखील सरकारी यंत्रणेवर येतो आहे. त्यामुळे इतर आजारांना, रुग्णांना सेवा पुरवणे कठीण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर खाजगी दवाखाने बंद असल्याने सरकारी यंत्रणेला इतर रुग्णांनांवर उपचार करणे कठीण झाले आहे. यामुळे खासगी वैद्यकीय यंत्रणेने कार्यरत राहणे आवश्यक आहे, असे मत पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केले.

परदेशी यांनी याबाबत ‘लोकसत्ता’शी संवाद साधला असता ते म्हणाले की, ‘५०च्या पुढे वय असलेल्या आणि मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे आजार असलेल्यांना धोका जास्त आहे. तसेच कर्करोगाच्या आजाराचे अत्यवस्थ पण त्यांना करोना झाला आहे, अशा रुग्णांच्या मृत्यूचे कारण निश्चित करणे याबाबत आरोग्य यंत्रणा संभ्रमात आहे’.

दरम्यान, करोनाचे जेवढे रुग्ण आहेत त्यापैकी ८३ टक्के रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. ३४ जण म्हणजे २ टक्के लोक गंभीर स्थितीत आहेत. २३९ जण बरे झाले आहेत. १२१ जण मृत पावले आहेत. मृतांचा आकडा कमी करण्यावर आमचा भर आहे,’ असं पालिका आयुक्त प्रवीण परदेशी म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!