Share

आजपासून खाजगी क्लासेस सुरू; कारवाई केल्यास जेल भरो आंदोलनाचा ‘भाजप’चा इशारा!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना प्रशासनाच्यावतीने शाळा महाविद्यालय, खाजगी कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश काढण्यात आले होते. परंतु ते पुन्हा सुरू करण्याची परवानगी देताना खाजगी कोचिंग क्लासेसचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून संचालक व शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आजपासून जवळपास ७० टक्के कोचिंग क्लासेसधारकांनी स्वनियमावली बनवून दारे उघडली आहेत. कारवाई केल्यास विद्यार्थी, पालक, कोचिंग क्लासेस संस्थाचालक, विद्यार्थी जेलभरो आंदोलन करतील असा ईशारा भाजप प्रणित कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने देण्यात आला.

खासगी क्लासेस चालकांची उपासमारी थांबवण्यासाठी मंगळवारपासून शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. सोमवारी भाजप प्रणित कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. दिड वर्षांपासून शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस बंद असल्याने खासगी शिकवणी घेणारे शिक्षक व प्राध्यापक यांचे उत्पन्न ठप्प झाले आहे. जवळपास दहा हजार शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तसेच क्लासेसचे भाडे, शिक्षकांचे पगार, घराचे हप्ते, मुला-मुलींची शैक्षणिक फीस, सर्व कर्ज थकलेले आहे. त्यामुळे संचालकांवर आत्महत्येची वेळ येऊन ठेपली आहे. तसेच त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग माडकीकर म्हणाले विद्यार्थी पालकांसोबत जेलभरो आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी असोसिएशनच्या वतीने सरकारला देण्यात आला. यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दळवी, प्रा. योगेश रोजेकर आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!