Share

#coronavirus : पृथ्वीराज चव्हाणांनी करोनाविरोधी जनजागृतीची उभारली आघाडी

Published On: 

मुंबई : सध्या संपूर्ण देशाचे युद्ध कोरोना या विषाणूशी सुरु आहे. शासन प्रशासनाकडून नागरिकांना बाहेर न जाण्याचे सतत आवाहन केले जात आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पोलिस सर्वजण आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहे.

तसेच याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील ते स्वत: गावोगावी जाऊन लोकांना या आजाराचे गांभीर्य पटवून देत घ्यावयाच्या दक्षतांचे तंतोतंत पालन व्हावे म्हणून आवाहन करत आहेत.

करोनाला हरविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली १८ सदस्यांची कृती समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चव्हाण हे बैठका घेतात.

दरम्यान, रविवारी चव्हाण यांनी शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, की करोनाचे संकट सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हवे. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क बांधा, ठरावीक अंतर ठेवा, प्रशासन व वैद्यकीय यंत्रणेला साथ द्या, जबाबदारीने वागा, सुरक्षिततेसाठी घरीच रहा, असं आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!