Share

उद्यापर्यंत सरकार स्थापन झाले नाही, तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता – पृथ्वीराज चव्हाण

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :- राज्य आणि शेतकरी अडचणीत आहे. मात्र शिवसेना आणि भाजप मुख्यमंत्री कोणाचा यातच अडले आहेत. त्यांना जनतेने सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने वागावे. उद्यापर्यंत सरकार स्थापन झाले नाही, तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे, असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.स्व. यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यगौरव सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, शिवसेना आणि भाजपला जनतेने बहुमत दिले आहे. ते जबाबदार पक्ष असून त्यांनी जबाबदारीने वागावे, असा सल्ला त्यांनी दोन्ही पक्षांना दिला. दरम्यान,राज्यातील सत्ता स्थापनेचा अभूतपूर्व प्रसंग निर्माण झाला आहे. स्पष्ट जनादेश मिळूनही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावरून अडून बसल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे.

शिवसेना सत्तेचे समान वाटप आणि मुख्यमंत्रिपद कार्यकाळही निम्मा निम्मा अशा समीकरणावर कायम आहे. दुसरीकडे मुख्यमंत्रिपद सोडून कोणत्याही फॉर्म्युलावर चर्चेला तयार असल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192423000898826240?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192433036635148288?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192440332660555776?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!