जयपूर- राजस्थान मध्ये सध्या मोठे राजकीय संकट पाहायला मिळत आहे. युवा नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने राजकीय अस्थिरता त ठिकाणी निर्माण झाली आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेला तमाशा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बंद करावा असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.
अशोक गहलोत म्हणाले, ‘भाजपचा घोडेबाजाराचा खेळ खूप मोठा आहे.त्यांच्या तोंडाला रक्त लागलं आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश ते यशस्वी झाल्यामुळेच ते आता राजस्थानमध्ये प्रयोग करत आहेत. देशाचं गृहमंत्रालयच या कामात सहभागी आहे. धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल यांच्यासह अनेक मंत्र्यांचा या घोडेबाजारात सहभाग आहे.’भाजपाकडून सुरु असलेला हा घोडेबाजार अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. कर्नाटक आणि मध्यप्रदेशात राबवलेला प्रयोगच इथे केला जातो आहे असाही आरोप गेहलोत यांनी केला.
WATCH: …Prime Minister should stop the 'tamasha' going on in Rajasthan. The rate for horse-trading has increased here. What 'tamasha' is this?: Rajasthan Chief Minister Ashok Gehlot in Jaisalmer pic.twitter.com/W9s9THllBJ
— ANI (@ANI) August 1, 2020
विधानसभेचं अधिवेशन घेण्यासंबंधीची घोषणा झाल्यानंतर घोडेबाजाराला उत आला आहे. सरकार पाडण्यासाठी आमदारांच्या खरेदी विक्रीचा खेळ सुरु आहे. या सगळ्या मागे भाजपाच आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीनींच हा सगळा तमाशा आणि घोडेबाजार बंद करावा असं म्हणत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
‘राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये’
‘राजू शेट्टी भंपक माणूस आहे,गावात जसा सोडलेला वळू असतो तसा हा वळू आहे’
राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

