Share

राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत – देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई : दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह महायुतीनेआंदोलनात उडी घेतली आहे.

दरम्यान, दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या दूध बंद आंदोलनाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरीला विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करुन आंदोलनाची सुरुवात केली. तर शिर्डीच्या पुणतांब्यातही शेतकऱ्यांनी बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलन सुरु केले. यावेळी शेतकऱ्यांनी दुधाला भाव मिळालाच, पाहिजे अशी घोषणाबाजीही केली.

एका बाजूला शेतकरी हितासाठी हे आंदोलन सुरु असताना राज्य सरकारच्या बचावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी धावले आहेत.शेट्टी यांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, भाजप काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन असेल तर ही शुद्ध दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

‘राजू शेट्टी भंपक माणूस आहे,गावात जसा सोडलेला वळू असतो तसा हा वळू आहे’

‘भाजपचे आजचे आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. कारण, ठोस उपाय योजना करण्याचे काम हे केंद्र सरकारचे आहे. केंद्राने आयात थांबवली पाहिजे, निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे आणि जीएसटी मागे घेतला तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल’ असं म्हणत राजू शेट्टींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

यावर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेट्टी यांना जोरदार टोला लगावला आहे. दरम्यान, राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलनात सहभाग घेत राज्यातील महाविवास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारने दूध भुकटीची आयात केल्याचा आरोप करत आहेत. मात्र केंद्र सरकारने एक ग्रॅमही दूध भुकटी आयात केलेली नाही. यावेळी फडणवीस यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावरही टीका केली. राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

राज्यातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करणार – उद्धव ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!