पुणे : ग्लोबल शिक्षक पुरस्कार मिळलेलं सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले गुरुजी यांना कोरोनाची लागण मागील आठवड्यात झाली होती. मागील आठवड्यात डिसले गुरुजी यांचा मुख्यमंत्री तसेच वरिष्ठ मंत्री, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सत्कार केला होता.
डिसले गुरुजींना कोरोनाची लागण झाल्यानंतर उपसभापती कार्यालयाच्या वतीने दररोज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात येत होती. त्यांचे आज दि.१७ डिसेंबर, २०२० रोजी दूरध्वनीवरून ना.डॉ.गोऱ्हे यांनी डिसले यांची व त्यांच्या कुटुंबाची तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी जे कार्य केले आहे, त्यांचे देशाला मोठा फायदा होत आहे. त्यांची तब्येत लवकर चांगली होऊन कार्याला सुरवात करावी असे ना.डॉ.गोऱ्हे यांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना घोषित करण्यात आला. महाराष्ट्राच्या सोलापूर मधील रणजितसिंह डिसले यांच्या नावाची शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अशी ओळख असणाऱ्या मानाच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यानंतर, त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला होता. तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील त्यांचं कौतुक करून सत्कार केला होता. त्यांच्या या गौरवामुळे महाराष्ट्राची मान जागतिक पातळीवर उंचावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात होणार देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ !
- पर्यटन विकासाला चालना देण्यासाठीच बीच शॅक धोरणाला मंजुरी – आदित्य ठाकरे
- विकासप्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत पूर्ण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
- दरेकरांनी निधीची चिंता करू नये त्यासाठी आमचे अजितदादा खंबीर आहेत – निलेश लंके
- आरक्षण सोडत/ सरपंच व उपसरपंच यांची निवड मतदानानंतर 30 दिवसाच्या आत होणार


