पुणे : ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एक चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांना वाढत्या महागाई बाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच यावेळी कंगनाने केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं देखील गोखलेंनी समर्थन केल.
याबाबत विक्रम गोखले यांनी म्हणाले की, अनेक लोक हॉटेलमध्ये जाऊन एकाच वेळी 10 हजार रुपये खर्च करतात. एक माणूस 70 वर्षांची साचलेली घाण साफ करत आहे हे दिसत नाही का? यावेळी पाठिशी उभे रहायला हवं. पंतप्रधान मोदी देशासाठी काम करतात तेव्हा पाठिंबा आहे. मात्र, पक्षासाठी करत असतील तर पाठिंबा नाही, असेही विक्रम गोखले यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी कंगनाने केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं देखील गोखलेंनी समर्थन केल. कंगना जे म्हणाली ते खरं आहे, मी त्या वक्तव्याचे समर्थन करतो. कुणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळाले नाही, ते भिकेनेच मिळाले आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना कोणी वाचवलं नाही अनेकजण बघत राहिले असा गंभीर आरोप विक्रम गोखले यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे- मुख्यमंत्री ठाकरे
- शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे जीवनातली मोठी उपलब्धी- राज्यपाल कोश्यारी
- पुरंदरेंच्या निधनामुळे एक उत्तुंग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड-एकनाथ खडसे
- पुरंदरेंच्या जाण्यानी मनाला अतिशय वेदना होत आहेत-देवेंद्र फडणवीस
- पुरंदरेंच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली- पंतप्रधान मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

