Share

पुरंदरेंच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली- पंतप्रधान मोदी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज(१५ नोव्हें.)पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते १०० वर्षांचे होते. बाबासाहेबांच्या निधानानंतर सर्वच राजकीय स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

हे शब्दांच्या पलीकडचं दु:ख आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखी जोडल्या जातील. त्यांनी केलेली इतर कामेही स्मरणात राहतील, असं मोदींनी म्हटलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या विपुल कार्यामुळे नेहमी जिवंत राहतील. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!