Share

केंद्र सरकारचा ‘हा’ निर्णय देशातील विरोधकांची मुस्कटदाबी ठरता कामा नये – अमोल कोल्हे

Published On: 

मुंबई: भारताविरोधी प्रचार आणि खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल २० यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्स ब्लॉक केल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही कारवाई सुरूच राहील, असा इशारा दिला आहे. ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “जगभरातील अनेक मोठ्या देशांनी याची दखल घेतली याचा मला आनंद आहे. यूट्यूबनेही पुढे येऊन ब्लॉक करण्याची कारवाई केली.”

मात्र या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या निर्णयाचा काही अंशी विरोध केला आहे. अमोल कोल्हे यांनी या निर्णयाचे स्वागतही केले असून ते म्हणाले, खोटं पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनल बंद करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रीअनुराग ठाकूर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, पत्रकारिता या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे पावित्र्य आणि विश्वासाहर्ता अबाधित राहावी यादृष्टीने या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो. सदर निर्णय जरी स्वागतार्ह असला तरी आजकाल बऱ्याच अंशी प्रसारमाध्यमांवर “गोदी मिडिया” अशी टीका होत असताना केंद्र सरकारचा हा निर्णय देशातील विरोधकांची मुस्कटदाबी ठरता कामा नये, अशी अपेक्षा देखील अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!