🕒 1 min read
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील नट्टू काका हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक हे कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. रविवारी ३ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७८ वर्षी त्यांनी रूग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. तर रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अभिनेता अरविंद त्रिवेदी यांचे देखील निधन झाले. सिनेसृष्टीतील या दोन दिग्गज व्यक्तिमत्वांचे निधन झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मिडियावर दोन्ही कलाकारांसोबतचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर घनश्याम नायक यांच्यासोबत एक फोटो शेअर करत लिहिले, “गेल्या काही दिवसात, आम्ही दोन प्रतिभावान अभिनेते गमावले आहेत ज्यांनी त्यांच्या कसदार भूमिकेमुळे लोकांची मने जिंकली होती. श्री. घनश्याम नायक त्यांच्या उत्तम भूमिकांसाठी नेहमीच लक्षात राहतील.खास करुन ‘तारक मेहता..’ मधील त्यांच्या नट्टू काका यांच्या भूमिकेसाठी. ते खूप प्रेमळ, दयाळू आणि नम्र होते.” असे म्हणत मोदींनी शोक व्यक्त केला.
We have lost Shri Arvind Trivedi, who was not only an exceptional actor but also was passionate about public service. For generations of Indians, he will be remembered for his work in the Ramayan TV serial. Condolences to the families and admirers of both actors. Om Shanti. pic.twitter.com/cB7VaXuKOJ
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2021
तर दुसरीकडे, पंतप्रधान यांनी अरविंद यांना श्रद्धांजली देत एक ट्विट केले, “श्री अरविंद त्रिवेदी हे आज आपल्यात नाहीत, ते एक उत्तम कलाकार होते. तसंच ते उत्तम समाजसेवक देखील होते. भारताच्या येणाऱ्या सर्व पिढ्या, त्यांना रामायण या मालिकेतील त्यांच्या कामासाठी कायम स्मरणात ठेवतील. या दोन्ही दिग्गज अभिनेत्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. ओम शांती.” या दिग्गज कलाकारांच्या निधनामुळे त्यांचे चाहतेही दु : ख व्यक्त करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मराठा व ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपला फटका; पोटनिवडणुकीबाबत अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया
- ‘महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास वाढतोय, मुंबई महापालिकेवर एकत्र लढण्याचा विचार’
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- औरंगाबादेत पुन्हा बरसला जोरदार पाऊस, झाडे कोसळून वाहने चकनाचूर!
- दोन दिवसांच्या अंधारानंतर लातूरमधील ‘त्या’ गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
