टीम महाराष्ट्र देशा : कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापिठातर्फे सुरेश भट सभागृहात त्रिदिवसीय अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनाचे उद्घाटन उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मराठी भाषेवर भाष्य केलं.
यावेळी बोलताना बोलताना उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की, ‘भाषेला जाती किंवा धर्माच्या दृष्टिकोनातून न बघता संस्कृत भाषेचा प्रचार हा साध्या, सोप्या भाषेत करुन त्याची शब्दावली आजच्या आवश्यकतेनुसार समृद्ध करणे आवश्यक आहे. वैयक्तिक जीवनात स्थानिक भाषा ही अत्यंत महत्त्वाची असून, प्राथमिक शिक्षण हे केवळ मातृभाषेतच व्हायला हवे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.
पुढे बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की, वैयक्तिक जीवनात तसेच प्रशासनिक कार्यामध्ये स्थानिक भाषा महत्त्वाची आहे. मातृभाषेतून भावभावना, संकल्पना, व्याख्या आदी सहज स्पष्ट होतात. त्यामुळे मराठी भाषेतूनच प्राथमिक शिक्षण देणे महत्त्वाचे असल्यामुळे राज्यांनीही केवळ मातृभाषेतूनच शिक्षण द्यावे, असे आवाहनही उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.
दरम्यान यावेळी केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, परिषदेचे आयोजक आणि विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. श्रीनिवास वरखेडी, अखिल भारतीय प्राच्याविद्या परिषदेचे अध्यक्ष प्रा. गौतम पटेल, कार्यकारी सचिव प्रा. सरोजा भाटे, स्थानिक सचिव प्रा. मधुसूदन पेन्ना आणि कुलसचिव प्र. सी. जी. विजयकुमार यावेळी उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
