नाशिक: नाशिकमध्ये येत्या ३ ते ५ डिसेंबरमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) पार पडणार आहे. हे संमेलन अधीच अनेक कारणांमुळे वादात सापडलेले आहे त्यात आता आणखी एक भर पडणार आहे. साहित्य महामंडळाने राजकीय व्यक्तींना साहित्य संमेलनात प्राधान्य द्यायचे नाही, हे यापूर्वीच ठरवले आहे. मात्र याचे पालन होणार नस ल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, प्रकृती अस्वस्थ्यामुळे मुख्यमंत्री या संमेलनाला ऑनलाईन हजेरी लावणार असल्याचे समजते. साहित्य संमेलनाच्या समारोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची हजेरी असणार आहे. नाशिकच्या समंलेनाचे उद्घाटन ते समारोपाचा नारळ राजकीय व्यक्तीच फोडणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वतः पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे आहे. त्यामुळे साहित्यकांमध्ये नाराजी असल्याचे समजते.
संमेलनात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे हजेरी लावणार आहेत. एकंदरीतच काय तर व्यासपीठावर साहित्यिक कमी आणि राजकीय नेतेच जास्त दिसणार असल्याचे स्पष्ट होत आहे. साहित्य महामंडळाने राजकीय व्यक्तींना साहित्य संमेलनात प्राधान्य द्यायचे नाही, हे यापूर्वीच ठरवले आहे. त्यासाठी उस्मानाबादचे साहित्य संमेलनाकडे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून पाहता येईल. येथे स्वतः सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) प्रेक्षकांमध्ये बसले होते.
महत्वाच्या बातम्या:
- कोल्हापूर विधान परिषद; काँग्रेसचे सतेज पाटील यांची बिनविरोध निवड
- ..हा संसदेचा कार्यक्रम होता, पंतप्रधान किंवा पक्षाचा नाही-ओम बिर्ला
- खराब कामगिरीनंतर कृणाल पांड्याने सोडले बडोदा संघाचे कर्णधारपद
- मलिकांनी घरावर पाळत ठेवल्याची तक्रार ट्वीट करून का दिली; की गृहमंत्र्यांवरही विश्वास नाही?
- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचं कारण आलं समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

